हनुमंतखेड परिसरात होणार इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती

विदेशी गुंतवणूकदारांकडून MIDC परिसराची पाहणी

प्रतिनिधी | बुलढाणा
मोताळा तालुक्यातील हनुमंतखेड येथे प्रस्तावित एमआयडीसी परिसराची विदेशी गुंतवणूकदारांनी नुकतीच पाहणी करून औद्योगिक संधींचा प्रत्यक्ष आढावा घेतला. विशेषतः इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प तसेच आयर्न-स्टील प्रोसेसिंग उद्योग उभारण्याच्या दृष्टीने या परिसरातील शक्यता तपासण्यात आल्या.
मोताळा तालुक्यातील हनुमंतखेड परिसरातील एमआयडीसी येथे उद्योग समुह उदयास यावे, गुंतवणूकदरांनी मोठी गुंतवणूक करावी, परिसराचा विकास व्हावा, तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आ संजय गायकवाड यांनी प्रशासन दरबारी अनेकवेळा पाठपुरावा करत बैठका घेतल्या. त्यापश्चात त्यांच्या या पाठपुराव्याला आज मोठे यश मिळाले. दरम्यान या पाहणी दौऱ्यात आमदार संजय गायकवाड, उद्योगपती डॉ. विशाल गणेश बाहेकर, चीन येथील उद्योगपती जियांग, काई, मिस रुओचेन, गणेश बाहेकर तसेच ओमसिंग राजपूत उपस्थित होते. गुंतवणूकदारांनी या ठिकाणी भेट देवून पाहणी करत सतकारात्मक प्रतिसाद देखील दिला. भविष्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हनुमंतखेड परिसरातील जमीन, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक संधींची माहिती गुंतवणूकदारांनी घेतली. यावेळी परिसरातील वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, उपलब्ध जमीन तसेच औद्योगिक विस्ताराच्या संधींचा आढावा घेण्यात आला. प्रस्तावित प्रकल्पांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन स्थानिक औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या संभाव्य गुंतवणुकीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची शक्यता असून, भविष्यात हनुमंतखेड एमआयडीसी हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होऊ शकते, असे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.

रोजगारनिर्मितीला मिळणार मोठी चालना
हनुमंतखेड एमआयडीसी परिसरात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती तसेच आयर्न-स्टील प्रोसेसिंग उद्योग उभारणी झाल्यास बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. या उद्योगांमुळे स्थानिक युवकांना थेट नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच वाहतूक, यंत्रसामग्री दुरुस्ती, पुरवठा साखळी, लघुउद्योग आणि सेवा क्षेत्रालाही चालना मिळेल.

कोणते उद्योग उभारण्याची शक्यता?
इलेक्ट्रिक वाहन (इलेक्ट्रिक ट्रक) निर्मिती प्रकल्प
आयर्न-स्टील प्रोसेसिंग उद्योग
ऑटोमोबाईल पूरक उद्योग
लॉजिस्टिक व वेअरहाऊस सुविधा
या उद्योगांमुळे परिसरात औद्योगिक क्लस्टर विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा
प्रस्तावित गुंतवणुकीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. हनुमंतखेड एमआयडीसी विकसित झाल्यास जिल्ह्यातील उद्योगांना चालना मिळून भविष्यात हा परिसर महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येऊ शकतो.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!