पुण्यात  १५ दिवसांत पाणीपुरवठा बंद होणार? जलसंपदा विभागाचा इशारा’

मनीष अग्रवाल, पुणे

  पुणे शहरावर पाणी कपातीचे किंवा पाणीपुरवठा खंडित होण्याचे मोठे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेने जलसंपदा विभागाची तब्बल ९३२ कोटी ८८ लाख रुपयांची पाणीपट्टी थकवली असून, ही रक्कम येत्या 15 दिवसांत न भरल्यास पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्यात येईल, असा गंभीर इशारा जलसंपदा विभाग दिला आहे.

पुणे शहरासाठी वर्षाला ११.६० टीएमसी पाणी मंजूर आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, ३१ जानेवारीअखेर महापालिकेने ११.२३ टीएमसी पाण्याचा वापर पूर्ण केला आहे. आता केवळ ०.३६ टीएमसी पाणी शिल्लक असून, ते येत्या १२ ते १५ दिवसांत संपण्याची शक्यता आहे. मंजूर कोटा संपल्यानंतर खडकवासला धरणातून पाणी उचलता येणार नाही, असे विभागाने महापालिकेला स्पष्ट शब्दांत कळवले आहे. महापालिकेकडे आतापर्यंत ९५२ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेने नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांच्या पाणीपट्टीपोटी १९ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम जलसंपदा विभागाकडे जमा केली आहे, तरीदेखील फेब्रुवारीअखेर महापालिकेकडे ९३२ कोटी ८८ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. ही थकबाकी लवकर भरावी; अन्यथा मंजूर पाणी कोटा संपल्यानंतर तो तत्काळ खंडित करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!