सोलापूर–धुळे महामार्गावर सात तासांपासून वाहतुकीची कोंडी; भाविकांच्या गर्दीने यंत्रणा कोलमडली

प्रतिनिधी | सोलापूर

सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, तब्बल सात तास उलटूनही परिस्थितीत फारसा सुधार झालेला नाही. येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने लाखो भाविकांनी येरमाळाकडे धाव घेतली. परिणामी, महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, काही ठिकाणी ही रांग १० ते १५ किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. खासगी वाहने, बस, तसेच मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या मोठ्या संख्येमुळे कोंडी अधिकच वाढली आहे. वाहतुकीची कोंडी इतकी गंभीर झाली की अनेक प्रवासी रस्त्यावरच तासन्तास अडकून पडले. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व इतर मूलभूत सुविधांचीही कमतरता भासत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.  दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस व प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी भाविकांची वाढती संख्या आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण जात आहे.  या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!