भरधाव ट्रकची आयशरला धडक ट्रक चालक व क्लीनरचा मृत्यू

खामगाव - अकोला राष्ट्रीय महामार्ग सहा वरील वरखेड खुर्द गावाजवळील घटना

प्रतिनिधी | खामगाव
भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने शेळ्या घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाला मागून धडक दिली. या अपघातात ट्रक चालक व क्लीनरचा जागीच मृत्यू झाला तर आयशर मधील ८ शेळ्या जखमी झाल्या. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याची घटना घडली. ही घटना १३ मार्च रोजी पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार आयशर क्रमांक आर.जे. ११ जीडी ३७९६ चा चालक इन्साफ कयुम कुरेशी वय ३७ रा. विजयपूर (मध्य प्रदेश) हा आपल्या आयशर मध्ये सुरत येथील शेळया घेवून नांदेड जिल्हयातील भोकर कडे भरधाव वेगाने जात होता. दरम्यान खामगाव-अकोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वरखेड खुर्द फाट्याजवळ पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक आर.जे. ३२ जीडी २३७३ चा चालक इकबाल अली खान (२८) रा. भररानयना जिल्हा अलवर (राजस्थान) याने पाठी मागून धडक दिली. या धडकी मुळे झालेल्या अपघातात इकबाल अली खान व त्याचा सहकारी क्लिनर मौसमखान अशरूरखान वय ३२ रा. डवका जिल्हा अलवर (राजस्थान ) या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोचले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले.
या अपघात प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी आयशर चालक इन्साफ कय्युम कुरेशी यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून मृतक आरोपी इकबाल अली खान याचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका मनोहर गोरे करीत आहे.

000

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!