शेअर मार्केटमध्ये 1 कोटी बुडाले

सोलापूर

जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीद येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका शिक्षकासह त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक तळोदा तालुक्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळांना सुट्टी असल्याने ते पत्नी आणि दोन मुलांसह आपल्या मूळ गावी आले होते. याच दरम्यान त्यांनी कुटुंबातील सदस्यांना आईस्क्रीममधून विष दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षकानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.     प्राथमिक तपासात संबंधित शिक्षकाला शेअर मार्केटमध्ये एक कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक संकट आणि मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!