टिटवी येथे बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

लोणार,

तालुक्यातील आदिवासीबहुल टिटवी गावात सोमवारी (९ जून) क्रांतिकारक व आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 कार्यक्रमात बिरसा क्रांती दलाचे अमरावती विभागीय उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती लोणारचे संचालक भगवानराव कोकाटे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना त्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला.  भगवानराव कोकाटे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बिरसा मुंडा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी संघर्ष केला. केवळ २४ व्या वर्षी बलिदान देऊन त्यांनी इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले. १८९५ ते १९०० या कालावधीत छोटानागपूर परिसरात त्यांनी उभारलेली ‘उलगुलान’ चळवळ ब्रिटिश सत्तेविरोधातील महत्त्वाचा लढा ठरली, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य पंढरी कोकाटे, प्रसराम कोकाटे, दामोदर तनपुरे, मारोती गोऱ्हे, मुरलीधर कुटे, नारायण जाधव, गजानन दराडे, ऑपरेटर शांताराम जाटले, रतन कोकाटे, एकनाथ डवरे, धनेश्वर जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!