मेरा युवा भारततर्फे माय भारत बजेट क्वेस्टचे आयोजन

अमरावती,

 मेरा युवा भारत कार्यालयातर्फे युवकांमध्ये केंद्रीय बजेटबद्दल जागरुकता आणि समज विकसित करण्यासाठी माय भारत बजेट क्वेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम क्विझ स्पर्धा नोंदणी मोहिमेचा भाग म्हणून बहुस्तरीय आणि सहभागी स्वरुपात आयोजित केला आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयस्तरावरील ऑनलाईन क्विझचा समावेश राहणार आहे. ही स्पर्धा दि. 3 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी युवकांनी माय भारत पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी. प्रश्नमंजुषेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश स्तरावर निबंध लेखनासाठी निवड केली जाणार आहे. यात युवक केंद्रीय अर्थसंकल्प 2026 च्या प्रमुख विषयांवर विचार मांडतील. अंतिम टप्प्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरावर निवडलेल्या तरुणांना केंद्रीय अर्थसंकल्प 2026 वर धोरणकर्ते आणि मान्यवरांशी आभासी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांनी केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!