अमेरिकेच्या विरोधात रशियाने घेतली भूमिका

वृत्तसंस्था
अमेरिकेच्या निर्बंधांमुळे क्युबामध्ये निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने अमेरिकेच्या धोरणाच्या विरेाधात भुमिका घेत क्युबाची बाजू घेतली आहे. अमेरिकेने क्युबाला कच्चे तेल न देण्याची धमकी जगातिल अनेक देशांना दिली होती. रशिया ने अमेरिका विरोधात भूमिका अधिक तीव्र करत क्युबा ला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाकडून तेलवाहू जहाजांद्वारे क्युबाला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल पाठवले आहे. यामुळे क्युबाच्या ऊर्जा क्षेत्राला काहीसा दिलासा मिळणार असून, वीज आणि इंधन पुरवठा सुधारण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे अमेरिका-रशिया संबंधांमध्ये आणखी तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेने यापूर्वीच क्युबावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत, तर रशियाने या निर्बंधांना विरोध दर्शवत क्युबाला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे जागतिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात अमेरिका, रशिया आणि क्युबा यांच्यातील संबंध अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




