आमदार संजय गायकवाड यांचा आमदार आपल्या गावी उपक्रम; उबाळखेड येथे लोकसंवाद बैठक

परिसरातील समस्या तत्काळ निराकरण करण्याच्या दिल्या सूचना

मोताळा
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या “आमदार आपल्या गावी” या उपक्रमांतर्गत मोताळा तालुक्यातील मौजे उबाळखेड येथे लोकसंवाद व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार गायकवाड यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, अडचणी व विकासकामांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्या समस्या तत्काळ सोडवण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. ही बैठक मंगळवार २ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान पार पडली.

यावेळी बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान यावेळी गावातील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शासकीय योजनांचा लाभ, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या आमदारांसमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या ऐकून आमदार गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या व अनेक प्रश्नांवर जागेवरच निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावातील नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार निधीतून 5 लाख रुपये खर्च करून RO फिल्टर प्लांट उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार असून ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी विधानसभा समन्वयक गणेशसिंग राजपूत, मोताळा तालुका संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!