ॲड सरोदे यांची आ. गायकवाड वर खळबळजनक टीका

नावावरुन विधानकरणे म्हणजे अत्यंत बाळबोध, मुर्खपणाचे व र्निबुध्द असल्याचे लक्षण ; ॲड असीम सरोदे यांचे प्रतिउत्तर

नावावरुन विधानकरणे म्हणजे अत्यंत बाळबोध, मुर्खपणाचे व र्निबुध्द असल्याचे लक्षण ; ॲड असीम सरोदे यांचे प्रतिउत्तर

बुलडाणा,

बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुधवार १० जून रोजी सकाळी पत्रकार परिषद घेत विजयराज शिंदे यांच्या नोटीस प्रकरणाचे उत्तर दिले. दरम्यान यावेळी आ. गायकवाड यांनी नोटीस बजावणारे ॲड असीम सरोदे यांच्यावर ही जहरी टिका केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देत ॲड सरोदे यांनी असीम या नावाचा अर्थाचा उलगडा केला, तसेच आ. गायकवाड यांच्यावर टीका करतांना नावावरुण विधानकरणे म्हणजे अत्यंत बाळबोधपणाचे, मुर्खपणाचे व र्निबुध्द असल्याचे लक्षण असल्याची खळबळजनक टीका केली आहे.
बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी बदनाकारक वक्तव्य केल्या प्रकरणी १०० कोटी रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा केला अाहे. सदर दावा ॲड असीम सरोदे यांच्या माध्यमातून केला आहे. ॲड सरोदे हे नाव शिवाजी कोण होता या पुस्तकासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्यावेळी चर्चेत आले होते. ॲड सरोदे यांनी या प्रकरणात सरोदे यांनी आंबी यांची पाठराखण करत बुलडाणा शहरात सार्वजनिक रित्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जाहिर वाचन करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे जिल्हयाभर याच नावाची चर्चा अनेक दिवस रंगली होती. या प्रकरणाची चर्चा अद्याप संपली नसतांनाच विजयराज शिंदे यांनी ॲड सरोदे यांच्या माध्यमातून आ. गायकवाड यांना १०० कोटी रुपयाच्या अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देतांना आ. गायकवाड यांनी पुन्हा एकदा आपण आपल्या आरोपावर ठाम असून विरोधकांना आपण ही कोर्टातूनच उत्तर देवू असा दावा केला आहे. दरम्यान शिंदे यांचा विषय झाल्यावर आ. गायकवाड यांनी ॲड सरोदे यांच्यावर आपण आंबी प्रकरणापासून हे अर्ध भारतीय व अर्ध पाकिस्तानी नाव ऐकत असल्याची टीका ॲड सरोदे यांच्यावर केली होती. या टीकेला सडेतोड उत्तर देत ॲड सरोदे यांनी सांगितले की, आ. गायकवाड यांनी केलेल वक्तव्य हे माझी बदनामी करणारे आहे. ते कायदे मंडळात बसतात मात्र त्यांची भाषा ही सातत्याने बेकायदेशीरपणाची असते असा दावा करत पुतळे लावणे म्हणजे देशभक्ती नव्हे, असा त्यांचा गैरसमज झाला असावा, संस्कृत व संस्कृती यांच्याशी आ. गायकवाड यांचा कोणताही संबंध नसावा असे वाटते, संस्कृत भाषेत असीमचा अर्थ अपार, अमर्याद असा होतो. आपल्या संस्कृती मध्ये लग्नपत्रिकेत असीमकृपा असा शब्द वापरतो. मात्र नावापेक्षा कार्य बघावयास पाहिजे. नावावरुन विधानकरणे म्हणजे अत्यंत बाळबोधपणाचे, मुर्खपणाचे आणि निर्बुध्द असल्याचे लक्षण असल्याची

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!