संजुभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ भव्य दुग्धाभिषेक; छत्रपतींच्या सन्मानासाठी एकजूट

मोताळा  | बुलडाणा,

छत्रपतींच्या सन्मानाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडणारे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ मोताळा फाटा येथे भव्य दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शिवसेना, युवासेना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला कार्यकर्ते, शिवप्रेमी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज असा सन्मानपूर्वक उल्लेख कायम राखला पाहिजे, या भूमिकेला जोरदार समर्थन दर्शवले. छत्रपतींच्या नावाचा कोणताही एकेरी किंवा अवमानकारक उल्लेख सहन केला जाणार नाही, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.  या सोहळ्यादरम्यान संबंधित प्रकाशक प्रशांत आंबी याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी उपस्थित शिवप्रेमींनी एकमुखाने केली. कार्यक्रमादरम्यान परिसर पूर्णपणे शिवमय झाला होता. घोषणाबाजी, जयघोष आणि भगव्या पताकांनी वातावरण दुमदुमून गेले. छत्रपतींच्या सन्मानासाठी एकत्र येत आपली भूमिका ठामपणे मांडण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमासाठी शिवसेना, युवासेना, धर्मवीर युथ फाउंडेशन, किसान सेना तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरदचंद्र पाटील आणि शिवसेना नेते गजानन मामलकर यांनी मार्गदर्शन करत छत्रपतींच्या सन्मानाच्या मुद्द्यावर एकजूट राखण्याचे आवाहन केले.

एकूणच, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली निष्ठा, आदर आणि अस्मिता यांचे ज्वलंत दर्शन या दुग्धाभिषेक सोहळ्यातून घडले.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!