लेक माझी लाडकी अभियानांतर्गत ‘LIC विमा सखी’ स्वयंरोजगार भव्य मेळाव्याचे आयोजन

 

लोणार,

प्स्थानिक कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार तथा कै. कमलाबाई बनमेरू कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेक माझी लाडकी’ अभियानांतर्गत विमा सखी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 27 जुलै 2026 रोजी करण्यात आले होते.

कै. कमलाबाई बनमेरू व कै. कु. दुर्गाताई बनमेरू यांच्या पुण्यस्मरणार्थ हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जात असून, यावर्षी सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू सर उद्घाटक म्हणून लोकजागर परिवाराचे मुख्य विश्वस्त श्री. प्रवीण गीते, प्रमुख अतिथी म्हणून सौ. मीराताई भूषण मापारी,नगराध्यक्षा न. प. लोणार , सौ. वर्षाताई मापारी (सभापती, महिला व बालकल्याण न. प. लोणार) समाजसेविका सौ वैशाली तोडकर व स्वयंरोजगार मेळावा समन्वयक श्री. डी. एस. काळे साहेब (मुख् जीवन विमा सल्लागार LIC), श्री याकुब शेख तंटामुक्ती अध्यक्ष दुसरबीड इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रथम प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली ,यानंतर लेक माझी लाडकी अभियान अंतर्गत आयोजित स्वयंरोजगार मेळाव्याचे प्रास्ताविक प्रा. डॉ. कमलाकर वाव्हळ यांनी करत उपस्थितीना या आयोजनामागील भूमिका विषद केली. यानंतर प्रमुख अतिथी सौ मीराताई मापारी यांनी या स्वयंरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, बचत गट महिला व विद्यार्थिनींनी याचा फायदा घ्यावा व आपले भविष्य उज्वल करावे असा संदेश दिला. सोबतच महाविद्यालयाचे उपक्रम सतत प्रेरणादायी असतात असेही याप्रसंगी सांगितले. यानंतर लोकजागर परिवाराचे प्रमुख विश्वस्त श्री प्रवीण गीते यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीतून महिलांच्या समस्या त्यांना येणाऱ्या विविध अडचणी व त्यातून महिलांचे विकसित होणारे कौशल्य, नियोजन आणि परिवाराची धुरा सांभाळताना करावी लागणारी कसरत आणि त्यावरील उपाय तसेच बुलढाणा जिल्हा हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा असून माँसाहेब जिजाऊ व सावित्रीच्या लेकींनी आता स्वतःसाठी सुद्धा कसे जगावे व नेहमी आनंदित रहावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर स्वयंरोजगार मेळावा समन्वयक श्री. डी. एस. काळे साहेब (मुख् जीवन विमा सल्लागार LIC) यांनी अंगणवाडी सेविका बचत गट महिला व महाविद्यालयातील विद्यार्थिनींना LIC चे फायदे समजून सांगत आपण करत असलेल्या नोकरी किंवा व्यवसाय सोबत आपण एलआयसी सखी विमा प्रतिनिधी होऊन समाजात जाऊन आपल्या परिचयातील लोकांना एलआयसी चे महत्व सांगून भविष्यात घडणाऱ्या अनअपेक्षित घटनांपासून सुरक्षितता, वेळप्रसंगी उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरता एलआयसी किती महत्त्वाची आहे याबाबत माहिती सांगून उपस्थितीना विमा सखी प्रतिनिधी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वयंरोजगाराच्या विविध संधींची माहितीही दिली. या योजनेद्वारे महिलांना विमा क्षेत्रात करिअर घडविण्याची तसेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘LIC विमा सखी योजना’ विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य डॉ.प्रकाश बनमेरू यांनी महाविद्यालयाचे विविध उपक्रम व लेक माझी लाडकी अभियाना बाबत महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट करत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना व महिलांचा नेहमीच आमचे महाविद्यालय सन्मान करत असल्याचे सांगत यापुढेही विद्यार्थिनी व परिसरातील होतकरू महिलांसाठी विविध उपक्रम व योजना राबविणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक शिवशंकर मोरे तर बहारदार सूत्रसंचालन प्रा. डॉ. शारीक शेख यांनी केले. सदर स्वयंरोजगार मेळाव्यासाठी अंगणवाडी सेविका, बचत गट महिला व महाविद्यालयातील जवळपास 300 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!