साखरखेर्डा येथील खासदार चषक : प्रथम बक्षीस प्रहार संघाला

ट्रॉफी ऐवजी स्व. अजितदादांची प्रतिमा देवून वाहिली आदरांजली

प्रतिनिधी | बुलडाणा
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साखरखेर्डा येथे खासदार चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. ३० जानेवारी रोजी त्याचा बक्षीस वितरणाने समारोप झाला.
अतिम सामना प्रहार संघ साखरखेर्डा आणि संविधान एलेवन संघ जळगाव जामोद यांच्यात झाला. त्यामध्ये विजयी ठरल्याने प्रहार संघाला शिवसेना युवा नेते योगेश जाधव यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १ लाख एक हजार रुपये मिळविले. तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक माजी सरपंच महेंद्र पाटील यांच्याहस्ते संविधान संघाला ५१ हजाराचे, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल यांचेहस्ते आयांश इलेव्हन संघ साखरखेर्डा ३१ हजार रुपये, चतुर्थ बक्षीस २१ हजाराचे राजे छत्रपती व बजरंग संघाने पटकावले. यावेळी उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट बॅटिंग, बॉलिंग यांचेही खेळाडूंना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे अकाली अपघाती निधन झाल्याने फायनल मॅच सुरू होण्याअगोदर अजितदादांना सर्वांनी श्रध्दांजली अर्पण केली. बक्षीस वितरण करताना ट्रॉफी ऐवजी स्व. अजितदादांची प्रतिमा यावेळी प्रत्येक संघाला देण्यात आली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!