आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण

प्रतिनिधी | बुलडाणा

१ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा करण्यात आली नसली तरीही; अर्थसंकल्पानंतर कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज, २ फेब्रुवारी रोजी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम साठी १ लाख ६० हजार ७२० रुपयांवर आला. तर मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ६० हजार ५७० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण (Gold Silver Price Crash) सुरूच आहे.  सोन्याप्रमाणेच चांदीच्या घसरणीचा कलही कायम आहे. २ फेब्रुवारी रोजी सकाळी चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम ३,४९,९०० रुपयांपर्यंत घसरली. एका आठवड्यात किंमत १५ हजार रुपयांनी वाढली आहे.

अशी आहे सोन्याचे दर :

मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यात सोन्याचे दर: सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४७,१९० रुपये आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी १,६०,५७० रुपये इतका आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!