सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजातर्फे भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी | खामगाव
येथील सोमवंशी आर्य क्षत्रिय लोहार, गाडी लोहार, जिनगर समाज बांधवांतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान विश्वकर्मा जयंती ३१ जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे निर्माता आहे. शासनाने सन २०२५ पासून भगवान विश्वकर्मा जयंती सर्व शासकिय आणि निमशासकिय कार्यालयांमध्ये साजरी करण्याबाबत आदेश जारी केलेले आहे. त्याअनुषंगाने यंदा ३१ जानेवारी रोजी भगवान विश्वकर्मा जयंती शहरात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. दरम्यान शहरातील सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजकडून येथील टॉवर चौकस्थित कार्यालयात सायंकाळी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थितांनीही भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाला समाजाचे जेष्ठ कार्यकारीणीचे डिगांबर मानेकर, सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचे युवा संघटन अध्यक्ष अनुप गवळी, मुन्ना जाधव, अनिल नगरे, रजनीश चव्हाण, सुशांतराज घवाळकर, शाम वानखेडे, यश निधानकर यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!