संत शिरोमणी नरहरी महाराजांचा ७४० वा पुण्यतिथी महोत्सव लोणार येथे उत्साहात संपन्न

लोणार | प्रतिनिधी

सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री. नरहरी महाराज सोनार यांच्या ७४० व्या पुण्यतिथीनिमित्त लोणार येथील श्री मंगल कार्यालयात भक्तिभावपूर्ण वातावरणात भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात व श्रद्धेने पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश मापारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.

या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश सदगीर, पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे, पोलीस उपनिरीक्षक घोगरे, माजी सभापती संतोष मापारी, नगर परिषद बांधकाम विभाग सभापती अनिकेत मापारी, नगर परिषद गटनेते मयूर गोलेच्छा, नगरसेवक भूषण मापारी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मंचावर सोनार समाजातील सन्माननीय ज्येष्ठ सुवर्णकार मंडळींची उपस्थिती लाभली होती. यानंतर ह.भ.प. श्री. हाडे गुरुजी महाराज यांनी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जीवनकार्यावर सखोल व प्रेरणादायी प्रवचन केले. संतांनी समाजात प्रामाणिकपणा, श्रमप्रतिष्ठा व भक्तीचा संदेश दिला असून त्यांच्या विचारांचे आचरण आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमात पटेल नगर महिला भजनी मंडळाने सादर केलेल्या सुमधुर व भावस्पर्शी भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले असून कार्यक्रमाला विशेष रंगत आली.  कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी आयोजक, भाविक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. हा पुण्यतिथी महोत्सव सामाजिक ऐक्य, भक्तीभावना व सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!