वरुड परिक्षेत्रात वाघाचा मृत्यू

वरुड परिक्षेत्रात वाघाचा मृत्यू

अमरावती,

अमरावती वनविभागांतर्गत येणाऱ्या वरुड वनपरिक्षेत्रात एक वाघ मृत अवस्थेत आढळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वरुडमधील वाई वर्तुळ, पंढरी बीट येथील खंड क्रमांक 1010 मध्ये घडली असून, याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे.

वाघाच्या मृत्यूची माहिती मिळताच वरुड येथील पशुधन अधिकारी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीनुसार, या वाघाचा मृत्यू साधारणतः 15 दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मृत वाघाचे शवविच्छेदन ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आले. त्यानंतर, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळीच वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या कार्यवाही दरम्यान वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉग स्कॉड, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मानद वन्यजीव रक्षक उपस्थित होते.

सदर प्रकरणाचा तपास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार केला जात आहे, अशी माहिती अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन के. आर. यांनी दिली.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!