सिंदखेडराजा बाजार समिती सचिवांच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारीला जाहीर लिलाव

सिंदखेडराजा बाजार समिती सचिवांच्या मालमत्तेचा ६ फेब्रुवारीला जाहीर लिलाव
जमीन महसूल थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाची कठोर कारवाई

बुलढाणा,

 कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदखेडराजा येथील सचिवांकडे प्रलंबित असलेल्या जमीन महसुलाच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकीचा भरणा न केल्याने, संबंधित सचिवांची मालमत्ता जप्त (समपहरण) करण्यात आली असून, येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार, सिंदखेडराजा यांनी दिली आहे.मौजे सिंदखेडराजा,गट क्रमांक ५५/१अ, क्षेत्र २.०२ हेक्टर, आकार ३२३२/- रुपये. आणि  मौजे किनगावराजा, गट क्रमांक ७८५, क्षेत्र ०.८१ हेक्टर, आकार ७.५०/- रुपये असे या मालमत्तेचे वर्णन आहे.या मालमत्तेचा जाहीर लिलाव दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता तहसील कार्यालय, सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आला आहे.

तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या नोटीसनुसार, लिलावाच्या दिवसापूर्वी थकबाकीची संपूर्ण रक्कम भरली न गेल्यास मालमत्ता सर्व भारांपासून मुक्त मानून जाहीर लिलावाद्वारे विकली जाईल. या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विहित वेळेत तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन महसूल प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!