राज्यसभेआधी बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक

मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मात्र, राज्यसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते शिवाजीरावर कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून, निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढवतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा वा विधानपरिषदेचे सदस्य होणे बंधनकारक असल्यामुळे ही पोटनिवडणूक आवश्यक ठरली आहे. बारामतीत अन्य कोणताही पक्ष उमेदवार देणार नाही, हेही स्पष्ट असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. सुनेत्रा पवार बारामतीतून पोटनिवडणूक लढवतील, तर पार्थ पवार राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) प्राजक्त तनपुरे यांना पराभूत केले होते. राहुरीचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले, परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागले. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे आयोगासाठी बंधनकारक आहे. आयोगाने यासाठी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या जागी त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून संधी मिळू शकते, तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरतील, असे बोलले जात आहे. मात्र सहानुभूतीची लाट पाहता शरद पवार नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!