श्री क्षेत्र जाळीचा देव यात्रेस आजपासुन सुरुवात

बुलडाणा आगारातुन नियमित सह तेरा बसेस धावताहेत भाविकांसाठी

जालना आगाराच्याही सात बसेस धाड मार्गे
प्रतिनिधी | बुलडाणा
बाराव्या शतकात अंधश्रध्दा व इतर बाबींवर प्रहार करत जात, पात व धर्म तसेच महिलांनाही शिक्षणाचा हक्क आहे, याचा प्रसार प्रचार करत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जाळीचा देव येथे आले होते. या ठिकाणच्या यात्रेला सुरुवात झाली असून १ फेब्रुवारी हा महत्वाचा दिवस राहणार असल्याने भाविकांची गर्दी बस स्थानकावर वाढली आहे. त्यामुळे बुलडाणा आगाराने दाेन अतिरिक्त यात्रा बस सुरु केली आहे. त्यामुळे नियमित बससह तेरा बसेस आता भाविकांसाठी धावणार आहे.
पश्चित व पुर्व विदर्भाातील महानुभाव पंथीय भक्तगण तसेच साधु महंत यांना श्री क्षेत्र जाळीचा देव येथे चक्रधर स्वामींच्या ओटयाचे दर्शन घेण्यासाठी बुलडाणा मार्गेच जावे लागते. त्यामुळे आजपासुन बुलडाण बस स्थानकासह खासगी बसेसकडे भाविकांची गर्दी वाढु लागली आहे. दहा ते पंधरा भाविक एकत्र आले की ते राज्य परिवहन महामंडळाची बस न लागल्यास एखादी मोठी गाडी करुन जाळीचा देव येथे जात आहेत. आज नागपुर येथील बहुतांश भक्त बुलडाणा बस स्थानकावर बसची वाट बघत होते. परंतु, वेळेवर बस न लागल्याने या भाविकांना सायंकाळी बराच वेळ बसच्या प्रतिक्षेत बसावे लागले. चक्रधर स्वामी महाराष्ट्रभर भ्रमण करत असतांना भंडारा, अमरावती व सातपुडा पर्वतरांगात बरेच दिवस असल्याने पुर्व व पश्चिम विदर्भात भक्तांची संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे या भागातील गर्दी अधिक वाढत आहे.
—सोमवारी सात बसेस वाढणार —
दररोज सुटणाऱ्या अजिंठा फेऱ्यांची संख्या सहा असून या व्यतिरिक्त दोन बसेस आज जाळीचा देव येथे सोडण्यात आल्या आहेत. तर दोन बसेस मुक्कामी आहेत. सोमवारी सात बसेस या व्यतिरिक्त अजिंठा व पर जिल्हयातुन धावणाऱ्या बसेस बघता जाळीचा देव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठया प्रमाणात बसेस उपलब्ध हाेणार आहेत.
— जालना येथुनही बस सेवा —
मराठवाडा भागात चक्रधर स्वामींची भ्रमंती झाली आहे. त्यात जालना जिल्हयातील भक्तगण हे जालना येथुन जाळीचा देव येथे येत असल्याने धाड मार्गे मढ कडुन या बस धावतात. त्यामुळे या सात अतिरिक्त बसेसची सेवा त्या भागातील भाविकांसाठी होणार आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!