श्रावणी ने दिल्लीच्या पैलवानांना दाखवले आकाश

मनीष अग्रवाल | पुणे

दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत कळस (ता. इंदापूर) येथील श्रावणी नवनाथ चौगुले हिने सुवर्णपदक पटकावत देशात प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हयातील कळस या लहानशा गावातील शेतकरी कुटुंबातील कन्येने दिल्लीतील कुस्ती आखाड्यात प्रतिस्पर्ध्याना आकाश दाखवत संपूर्ण देशात महाराष्ट्राची मान उंचावली आहे. कळस येथील श्री हरणेश्वर विद्यालयात सातवीत शिक्षण घेत असलेल्या श्रावणी नवनाथ चौगुले हिने दिल्लीतील त्यागराज स्टेडियम येथे पार पडलेल्या ८९व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाखालील (वजन गट ३६ किलो) वयोगटात सुवर्णपदक पटकावत देशात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी
स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय बलाढ्य मल्लांना एकामागून एक चितपट केले. अंतिम सामन्यात दिल्लीच्या पैलवानांना श्रावणीने तारे दाखवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!