९ फेब्रुवारीला दिवंगत लोकनेता अजित पवार यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन


अमरावती

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिवंगत  उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्याला  घेऊन येत्या सोमवार दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी  कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आ.संजय खोडके यांनी दिली.

दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून तमाम चाहते व समर्थक शोकसागरात बुडाले आहे. दादांच्या  पवित्र कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अमरावती येथे एक सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा व्हावी, अशी इच्छा आ.संजय खोडके व आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे येत्या सोमवार दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता ,संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन,अमरावती येथे अजितदादांच्या पवित्र कार्याचे स्मरण करून सामूहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते,आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध समाज संघटना, मंडळे व संस्थाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहतील, अशी माहिती आ.संजय खोडके यांनी दिली. तसेच सर्वानी दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील आ. संजय खोडके यांनी केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!