भरधाव कार झाडावर आदळली; एक ठार

चिखली,

खामगाव–जालना राष्ट्रीय महामार्गावरील  छोटा मेरा परिसरात झालेल्या कार अपघातात एकाचा मृत्यु झाला.  राजेंद्र (राजू) सुरडकर वय ३६, रा. बेराळा असे मृतक इसमाचे नाव आहे. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी रात्री घडली.

 मिळालेल्या  माहितीनुसार, सुरडकर हे स्विफ्ट डिझायर कारने आपल्या तिघा सहकाऱ्यांसोबत प्रवास करत होते. दरम्यान, छोटा मेरा–असोला दरम्यान भरधाव वेगाने जात असलेल्या कार वरुन चालकाचे  नियंत्रण सुटले व  कार रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात राजेंद्र सुरडकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.  उर्वरित तिघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!