तरुण मुली हरवण्याचे सत्र सुरुच; शहरातून पुन्हा तरुणी बेपत्ता

प्रतिनिधी | मलकापूर
गेल्या काही दिवसापासून मलकापूर शहर तसेच परिसरात तरुणी बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच आहे. असे असताना, तालुक्यातील सिराढोण येथून पुन्हा २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी मलकापूर ग्रामीण हरवल्याची नोंद घेण्यात आली आहे.
मलकापूर तालुक्यातील सिराढोण येथील रहिवासी असलेले तुकाराम चहादु राणे वय ४८ वर्षे हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १२ फेब्रुवारी रोजी तुकाराम राणे नेहमीप्रमाणे शेतातून घरी आले. परत संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ते गुरांचा चारा-पाणी करण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांची मुलगी वैष्णवी तुकाराम राणे वय २० वर्षे ही घरी एकटीच होती. तुकाराम राणे काम आटोपून घरी परतले तेव्हा त्यांना आपली मुलगी वैष्णवी घरात दिसून आली नाही. सुरुवातीला ती आसपास कोणाकडे गेली असावी, असा अंदाज त्यांनी बांधला. मात्र, बराच वेळ लोटूनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा गावात आणि शेजारी-पाजारी शोध घेतला. फोनद्वारे नातेवाईकांनाही विचारपूस केली. मात्र वैष्णवीचा कुठेही पत्ता लागला नाही.
या प्रकरणी तुकाराम राणे यांच्या तक्रारीवरुन मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेपत्ता वैष्णवीचे वय वीस वर्षे असून रंग गोरा आहे. तसेच तिने अंगात हिरव्या रंगाचा टॉप परिधान केलेला आहे. उपरोक्त वर्णनाच्या तरुणी बाबत काही माहिती मिळाल्यास मलकापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी बाळू टाकरखेडे यांनी केले आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!