अमेरिकेत ऐतिहासिक आंदोलन; लाखो अमेरिकननी धरले उलटे झेंडे

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जगभर तीव्र संताप

प्रतिनिधी | दिल्ली
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विचित्र धोरण राबवणे सुरु केले आहे, याचा त्रास अमेरिकेसह जगभरातील लोकांना होत आहे. इराण विरोधात सुरु केलेल्या युध्दामुळे जगातील शांतता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्यांच्या धोरणाच्या विरोधात मिनेसोटा या ठिकाणी लाखो लोकांनी ऐतिहासिक आंदोलन करत ट्रम्प यांचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी अनेक अमेरिकनानी देशाचा ध्वज उलटा धरत नाराजी व्यक्त केली. हे आंदोलन शनिवार २८ मार्च रोजी दुपारी करण्यात आले.

सदर आंदोलन वाशिंग्टन डीसी मध्ये ही करण्यात आले. या ठिकाणी लिंकन मेमोरिअल समोर लोकांनी मोर्चा काढत ट्रम्प यांना पायउतार करण्याची मागणी करण्यात आली. तर न्युयार्क सहित ५० राज्यात सुमारे ४१ हजार ठिकाणी आंदोलने करण्यात आली असल्याची माहिती आहे. या सह सॅन दिएगो, रोम, लंडन, पॅरीस, या ठिकाणी देखील निषेध नोंदवण्यात आला आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!