इराणने कच्या तेलावर ७० टक्के सुट जाहिर केल्याने जगभरात खळबळ
इराणचा मास्टर स्ट्रोक ! एकाच अटीवर मिळणार तेल

वृत्तसंस्था
जागतिक बाजारपेठेत आपले स्थान टिकवण्यासाठी इराणने कच्च्या तेलाच्या विक्रीवर तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र एकच अट त्यांनी ठेवली आहे, ती म्हणजे ज्या देशाला तेल हवे आहे त्यांनी होर्मुझ मध्ये येवून तेल घेवून जावावे. या घोषणेने जगभरातील बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे.
इराणने स्पष्ट केले आहे की, ही सवलत फक्त त्या देशांनाच मिळेल जे लादल्या गेलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून थेट इराणसोबत व्यवहार करतील. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेली ही ऑफर राजनैतिकदृष्ट्या गुंतागुंतीची ठरत आहे. अमेरिकेच्या कठोर निर्बंधांमुळे इराणच्या तेल निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, आपली बाजारपेठ टिकवण्यासाठी इराणकडून सवलतींचा मार्ग अवलंबला जात आहे. दरम्यान, जागतिक पातळीवर तेलाच्या किमतीत होत असलेल्या चढ-उतारांमुळे अनेक देश स्वस्त पर्यायांच्या शोधात आहेत. भारत सारख्या मोठ्या तेल आयातदार देशांसाठी ही ऑफर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. स्वस्त दरात कच्चे तेल मिळाल्यास इंधन दरांवर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकते. मात्र, अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास आर्थिक आणि राजनैतिक परिणामांना सामोरे जावे लागू शकते, ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे.
एकूणच, इराणची ही ७० टक्के सूट ही केवळ व्यावसायिक ऑफर नसून ती जागतिक राजकारण, निर्बंध आणि ऊर्जा सुरक्षेशी जोडलेली रणनीती मानली जात आहे. त्यामुळे संबंधित देशांसाठी हा निर्णय फायदेशीर की धोकादायक, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.




