खळबळ जनक; एटीएस पथकाची रायपूरात धडक कारवाई

अवैध शस्त्रसाठ्यासह बाहेर जिल्हयातील लपलेल्या आरोपीना केली अटक

बुलडाणा

  बुलडाणा पोलिस व दहशतवाद विरोधी पथक अकोला यांनी संयुक्त कारवाई करत अंत्रीकोळी परिसरातून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना अटक केली. आरोपींकडून दोन देशी बनावटीच्या पिस्टलसह ७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही १८ मे च्या रात्री करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार एटीएसच्या विशेष पथकाला बुलडाणा जिल्हयातील रायपूर परिसरात बाहेर जिल्हयातील शस्त्रधारी आरोपी लपलेली असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  १८ मे रोजी ग्राम अंत्रीकोळी ता. चिखली येथे  ही धडक कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान  शुभम सागर पवार (रा. वर्धा), रुपेश मिलन शिंदे व रोहेल मिलन शिंदे (रा. जालना) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून दोन देशी बनावटीच्या पिस्टल, चार मॅगझीन, ९२ जिवंत काडतुसे, दोन वापरलेली काडतुसे, लोखंडी चाकू, महिंद्रा XUV500 वाहन तसेच आयफोन 16 प्रो मॅक्स मोबाईल असा एकूण अंदाजे ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सोळंके, पोहेका दशरथ शितोळे, ज्योती गलबले, राहुल जाधव, अनंत कळमकर, अख्तर शेख, लक्ष्मण शिंदे, चालक सागर कोरडे तसेच एटीएस अकोला पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!