तुफान राडा; भाजपचे नेते आपसातच भीडले

माजी आमदार, माजी मंत्रयाच्या समर्थकात फ्री स्टाईल

प्रतिनिधी | उत्तरप्रदेश
प्रतापगड येथील दिलीपसूर मध्ये आयोजित एका कार्यक्रमातच भाजपचे दोन नेते आपसात भीडले. यावेळी उपस्थित त्यांचे समर्थक ही आक्रमक झाल्याने दोन्ही गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. ही घटना दिलीपपूर येथील विश्राम भवानात नुकतेच घडली.
मिळालेल्या माहितीनुसार दिलीपपूर येथील विश्राम भवनात भाजपच्यावतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणीगंज विधानसभेतून माजी आमदार धीरज ओझा व माजी मंत्री शिवाकांत ओझा यांनी तिकीटासाठी आतापासूनच शक्तीप्रदर्शन करणे सुरु केले आहे. या ठिकाणी पुढील वर्षी निवडणूका होणार आहे. असे असले तरीही वातावरण आतापासूनच तापत असल्याचे चित्र आहे. दरम्यान या प्रशिक्षण कार्यक्रमात माजी आमदार धीरज ओझा हे विश्रामभवनात आधी पोहचले त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांसोबत प्रशिक्षण सुरु केले. थोडयाच वेळात माजी मंत्री शिवाकांत ओझा हे ही आपल्या वाहनाने समर्थकासोबत विश्राम भवनात पोहचले. हे पाहताच धीरज ओझा हे कार्यकर्त्यांसह दरवाज्यात पोहचले. दोन्ही नेते समोरा समोर येताच दोन्ही कडील कार्यकर्त्यांत झिंदाबादचे नारे सुरु झाले,यावेळी एकमेकांना खुन्नस देत दोघांनी एकमेकांना शाब्दीक वाद केला. यावेळी कार्यक्रमात भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते माेठया प्रमाणात उपस्थित होते. सदर शाब्दीक वाद वाढत गेला व एक मेकांना अश्लील शिविगाळ सुरु झाली. हे पाहून उपस्थित दोन्ही गटाचे समर्थक आपसात फ्री स्टाईल मध्ये हाणामारी झाली. यावेळी पोलीसांनी पुढाकार घेतल्याने सदर प्रकरण निवळल्याची माहिती आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!