युगांडाच्या लष्करप्रमुखाची अजब मागणी

बाई पाठवा अन्यथा राजकिय संबंध तोडू

प्रतिनिधी | वृत्तसंस्था

सातत्याने वादात राहणाऱ्या युगांडाचे लष्करप्रमुख पुन्हा वादात सापडल आहे. युगांडाचे लष्करप्रमुख मुहुजी काइनरुगाबा यांनी  तुर्कस्तानकडून 1 अब्ज डॉलर आणि ‘सर्वात सुंदर महिले’ला आपली पत्नी बनवण्याची मागणी केली आहे. त्यांनी इशारा दिला की, जर ही मागणी पूर्ण झाली नाही, तर तुर्कस्तानसोबतचे राजनैतिक संबंध संपुष्टात आणले जातील आणि तुर्कीश एअरलाइनवरही बंदी घातली जाऊ शकते असा इशारा दिला आहे. यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे.

काइनरुगाबा यांनी X वर लिहिले की, जर तुर्कस्तानने आमच्या समस्यांचे निराकरण केले नाही, तर 30 दिवसांच्या आत संबंध तोडले जातील. त्यांनी असेही म्हटले की, एकतर त्यांनी आम्हाला पैसे द्यावेत किंवा आम्ही त्यांचे दूतावास बंद करू.  त्यांनी युगांडाच्या नागरिकांना तुर्कस्तानला जाणे टाळण्याचा सल्ला दिला आणि त्याचबरोबर इस्रायलच्या समर्थनार्थ 1 लाख सैनिक पाठवण्याची ऑफरही दिली. मात्र, यावर तुर्कस्तान किंवा सोमालियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही आणि हे विधान सरकारी धोरण आहे की त्यांचे वैयक्तिक मत आहे, हे देखील स्पष्ट नाही.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!