बांधकाम कामगार कल्याण विभागात कमिशनराज?

कमिशन देण्यास विरोध करताच मजूरास केली हाणामारी

प्रतिनिधी | चिखली

शासकीय योजनेतील शिष्यवृत्ती जमा झाली किंवा नाही यांची माहिती घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडून बांधकाम कामगार कल्याण अधिकाऱ्याच्या नावाने कमिशन मागण्यात आले.  सदर कमिशन देण्यास विरोध केला असता आरोपींनी मारहाण केली. ही घटना चिखली येथील गोपाल टॉकीज परिसरात घडली आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात चार वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नु कतेच करण्यात आली.

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार संदिप महादेव शिंगणे (वय 36, रा. रोहिदास नगर, चिखली) हे 15 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता आपल्या काकांसह बांधकाम कामगार कल्याण कार्यालयात मुलाला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती घेण्यासाठी गेले होते. यावेळी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना जवळील एका ऑनलाइन सेंटरमध्ये माहिती मिळेल असे सांगितले. यानुसार ते गोपाल मल्टीसर्व्हिस ऑनलाइन सेंटरमध्ये गेले असता, तेथे उपस्थित असलेल्या गोपाल सुरडकर याने शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी साहेबाला 30 टक्के म्हणजेच सुमारे 3 हजार रुपयांचे कमिशन देण्याची मागणी केली. यास विरोध करताच गोपाल सरोदे याने शिवीगाळ करत शिंगणे यांना दुकानाबाहेर हाकलले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, त्यांचे काका सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच गोपाल सुरडकर व इतन तीन अनोळखी साथीदारांनीही या मारहाणीत सहभाग घेतला. या झटापटीदरम्यान शिंगणे यांच्या डोक्यात मार लागून ते जखमी झाले.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात संदीप शिंगणे यांच्या तक्रारवरुन गोपाल सुरडकर सहित चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

बांधकाम कामगार कल्याण विभागात कमिशनराज?

मजूरांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अनेक मजूर कमिशन देत आहेत, अशी खात्रीलायक माहिती आमच्या हाती आली आहे. हा प्रकार केवळ चिखली येथेच नव्हे तर अनेक ठिकाणी सर्रास सुरु आहे. जो पर्यत अधिकाऱ्याच्या नावे कमिशन दिले जात  नाही, तो पर्यत योजनेचा लाभ लाभार्थींना मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे बांधकाम कामगार कल्याण विभागात कमिशनराज सुरु आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!