घराघरात संगीत शिक्षक असावा – बालासाहेब सूर्यवंशी

दोन दिवशीय संगीत शिक्षक, परिक्षक, केंद्र व्यवस्थापक ,विद्यार्थी कार्यशाळेचे थाटात उद्घाटन बुलडाणा 

 

बुलडाणा

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांनी भारतभर भ्रमंती करून घराघरात संगीत पोहोचवण्याचं काम केलं . अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्थापना त्यांनीच केली . गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या माध्यमातून संगीत परीक्षांचे आयोजन भारतासह इतर काही देशांमध्ये देखील केल्या जाते. यातून संगीताचे विद्यार्थी घडत असतात.प्रत्येक गावात,प्रत्येक घरात संगीत शिक्षक असावा.प्रत्येक विद्यार्थ्यांनी संगीत शिकावे हा ध्यास घेऊन गांधर्व महाविद्यालय मंडळ काम करत असते .संगीताच्या माध्यमातून घडलेले विद्यार्थी कुठल्याही गैरकृत्यात सहभागी होत नाही. संगीत ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे शांतता लाभू शकते. संगीतामुळेच भारतासह जगातही शांतता लाभू शकते.संगीताचे उपासक हे प्रत्येक ठिकाणी निर्माण झाले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने आयोजित संगीत शिक्षक, परीक्षक, केंद्र व्यवस्थापक व विद्यार्थी यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष बालासाहेब सूर्यवंशी यांनी केले.या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ललित कला नृत्य अकादमीच्या छाया तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली कथ्थक नृत्याच्या माध्यमातून गणेश वंदना विद्यार्थिनींनी सादर केली. कथ्थक नृत्याच्या मार्गदर्शिका वैशाली दुधे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की हिंदुस्तानी संगीताची सुरुवात ही द्रुपदापासून झाली आहे. ऋतुजा कुलकर्णी व आर्या महाजन यांनी साडेसात मात्रेच्या निल तालातील गणनाथा गौरी हे द्रुपद कथ्थक नृत्य सादर करून उपस्थित रसिकांची दाद मिळाली. या कार्यशाळेचे आयोजन दिनांक 23 व 24 मे रोजी बुलढाण्यातील सहकार विद्या मंदिर येथे करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सरस्वती व पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपवजलन करून मान्यवरांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे सचिव पं. सुधाकर चव्हाण कोषाध्यक्ष सुनील हुकीर कार्यकारणी सदस्य जनार्धन गुडे, प्रबंध परिषद सदस्य डॉ. अंजुषा पांडवकर,रजिस्ट्रार प्रा. विश्वास जाधव, तबला तज्ञ मार्गदर्शक डॉ.प्रवीण करकरे ,कथ्थक तज्ञ मार्गदर्शक डॉ. वैशाली दुधे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलतांना प्रा. विश्वास जाधव म्हणाले की,अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ हे एका कुटुंबासारखे आहे. या कार्यशाळेच्या निमित्ताने कुटुंबातील सर्व व्यक्तींचे हे एक संमेलन या ठिकाणी आहे.गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या माध्यमातून तीन लाख पेक्षा जास्त विद्यार्थी प्रत्येक सत्रातील संगीत परीक्षांना बसत असतात. यानिमित्ताने अनेक शिक्षक व विद्यार्थी या परिवाराशी जोडल्या गेल्या आहेत अनेक संगीत शिक्षकांचा उदरनिर्वाह या माध्यमातूनच होत असतो.या सर्व बाबींचे श्रेय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे संस्थापक स्व.पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांच्याकडे जाते.संगीत हे जनसामान्यांपर्यंत पोहोचावे हाच ध्यास घेऊन हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी सातत्याने करत असतात. या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थी यांना अद्यावत संगीत ज्ञान प्राप्त व्हावे हा उद्देश ठेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेत. कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या सत्रात लय लयकारी लेखन याबाबत डॉ.प्रवीण करकरे व बालासाहेब सूर्यवंशी यांनी विस्तृत मार्गदर्शन करून लय व लयकारी यांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास कोल्हे यांनी केले तर सूत्रसंचालन भगवान राईतकर यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 250 पेक्षा जास्त संगीत शिक्षक, केंद्र व्यवस्थापक व प्रशिक्षक उपस्थित आहेत.कार्यशाळेच्या आयोजनासाठी कैलास कोल्हे, अरविंद टाकळकर,के .जे . तायडे यांचेसह बुलढाणा शहरातील सर्व संगीत शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!