भीषण अपघात : पिकअप गाडी विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू: 6 गंभीर जखमी
विहिरीला कठडा नसल्याने गाडी घुसली विहिरीत

सोलापूर
जिल्हयातील माळशिरस येथे पिकअप गाडी विहिरीत कोसळून 8 जणांचा, तर 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना १४ जून रोजी दुपारी घडली. रस्त्याच्या बाजूलाच ही विहीर होती आणि या विहिरीला कठडे नसल्याने सदर घटना घडल्याची चर्चा आहे.
हा अपघात घडल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले असून ही गाडी विहीरीच्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड-पंढरपूर मार्गावरून सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक भरधाव जाणाऱ्या वाहनावरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले व सदर वाहन विहिरीत कोसळून भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे.



