अयोध्या येथील राम मंदिरात कोटयावधीची चोरी

२०० कोटी पेक्षा मोठा आकडा असल्याची शक्यता;एसआयटी स्थापन

अयोध्या

 अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी निधीमध्ये प्रारंभी ६ कोटी रुपये चोरीची चर्चा होती. मात्र आता  सुमारे २०० कोटी पेक्षा ही जास्त रुपयाची चोरी झाल्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.   कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मंदिरातील देणगी रकमेत  कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप होत असताना, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सद0स्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

   अयोध्या येथील श्रीराम मंदिरात या चोरी प्रकरणात एकूण ५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. सदर कर्मचारी मागील पाच वर्षात करोडपती झाले आहे त्यामुळे सदर प्रकरण समोर आले. या कर्मचाऱ्यांना केवळ १४ हजार असा पगार असतांना त्यांच्याकडे महागडे फोन, गाडया, शेती, घर अशी संपत्ती जमवली असल्याची माहिती समोर येत आहे. सदर चोरीची माहिती      समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना मिळाल्यावर त्यांनी  मंदिराच्या देणगीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याचा दावा करत सर्व व्यवहार नियमित लेखापरीक्षणाच्या प्रक्रियेतून जात असल्याचे स्पष्ट केले आहे. ा सदर चौकशी पूर्ण झाल्यानंतरच नेमके वास्तव समोर येणार आहे.

SIT देणगी निधीचा संपूर्ण आर्थिक मागोवा घेणार असून संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी, लेखापरीक्षण अहवाल आणि रोख व्यवहारांची पडताळणी केली जाणार आहे. या प्रकरणाकडे देशभरातील रामभक्तांचे लक्ष लागले आहे

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!