बुलडाण्यात कांग्रेस पक्षाच्यावतीने शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी

महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना निव्वळ धुळफेक;  जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार

बुलडाणा

   राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अटी व निकषांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात आंदोलन छेडले. जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.

आंदोलनादरम्यान बोलताना प्रकाश पाटील अवचार यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर टीका केली. त्यांनी सांगितले की, सरकारने जाहीर केलेली योजना सर्वसमावेशक नसून विविध अटी व नियमांमुळे अनेक शेतकरी या लाभापासून दूर राहणार आहेत. सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी त्यांनी केली.   अवचार यांनी आरोप केला की,  योजनेचा लाभ विशिष्ट कालावधीत वितरित झालेल्या आणि थकीत असलेल्या कर्जांपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीपासून कर्जबाजारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळू शकत नसल्याने ते या योजनेच्या कक्षेबाहेर राहतील. तसेच विहीर, पाईपलाईन, पशुपालन किंवा इतर शेतीपूरक कारणांसाठी घेतलेल्या कर्जांचा समावेश नसल्याने संबंधित शेतकरीदेखील वंचित राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.  नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या प्रोत्साहनपर लाभाच्या अटीही कठीण असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. मागील काही वर्षांतील कर्जउचल व परतफेडीच्या अटी पूर्ण केल्यानंतरच मर्यादित आर्थिक लाभ मिळणार असल्याने प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची उपेक्षा होत असल्याचा आरोप अवचार यांनी केला.

भाजप-शिवसेना महायुती सरकारची धोरणे शेतकरीहिताची नसून कर्जमाफीच्या नावाखाली बहुतांश शेतकऱ्यांना लाभापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसने दिला.

 वेळेस प्रदेश सरचिटणीस डाॅ अरविंद कोलते, काँग्रेस नेत्या डाॅ स्वातीताई वाकेकर, नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार, विरोधी पक्ष नेते न. प. डाॅ. ईसरार जमादार, दत्ताभाउ काकस, प्रमोद पाटील, अॅड भाउराव भालेराव, कलीम खान, प्रदिप देशमुख, आश्रृ फुके, स्वप्नील ठाकरे, अजय तायडे, किशोर भोसले, बबलू पठाण, वैभव इंगळे, विश्वदिप पडोळ, जिल्हाध्यक्ष Nsui तुषार खरे, अविनाश उमरकर, सतिष टाकळकर, कैलास देशमुख, गजनफर खान, सुनिल तायडे, निना इंगळे, ज्ञानेश्वर शेजोळे, गणेशराव पाटील , तुळशीराम नाईक, अमर पाचपोर, बाबू जमादार, मोहतेश्याम रजा, मुजमील खान, नासीर खान, सै. जुनेद, मीनाताई सातव, शेरूभाई, इरफान पठाण, समाधान दामधर, सै. आसीफ, अजहर देशमुख, शिवाजी क्षीरसागर, अनिल सावळे, आदी सह मोठ्या संख्येने

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!