बुलडाणा अर्बनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘बेस्ट रील स्पर्धा’
१४ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी; शहरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा
बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाचा गणेशोत्सव अधिक उत्साहपूर्ण करण्यासाठी शहरातील नागरिकांसाठी ‘बुलडाणा अर्बन बेस्ट रील स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आणि खुली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कल्पकतेला डिजिटल माध्यमातून सादर करण्याची संधी सहभागी स्पर्धकांना मिळणार आहे.
डिजिटल युगातील तरुणाई तसेच नागरिकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि गणेशोत्सवाचा उत्साह सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सवाशी संबंधित नाविन्यपूर्ण आणि आकर्षक संकल्पनेवर आधारित रील्सना स्पर्धेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
उत्कृष्ट रील्सची निवड करून सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. बुलडाणा शहरातील नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली असल्याने तरुणाईसह रील्स निर्माते आणि सोशल मीडिया वापरणाऱ्या नागरिकांना यात सहभागी होता येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी १४ सप्टेंबर २०२६ पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तसेच नाव नोंदणीसाठी ९०११०२३४२८, ७२७६९७५१४३, ९५५२४५२८८९ आणि ९११२७४०७८९ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
बुलडाणा शहरातील नागरिकांनी आणि रील्स निर्मात्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन आपली सर्जनशीलता दाखवावी, असे आवाहन बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




