उमेदवारी मिळो अथवा न मिळो, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार

श्रीकांत देशपांडेंची बुलढाण्यात पत्रकार परिषदेत घोषणा

बुलडाणा

येत्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने उमेदवारी मागणार आहोत, पक्षाच्यावतीने आपणाला उमेदवारी दिली तरीही अथवा दिली नाही तरीही आपण निवडणूक लढवणार, अशी  भूमिका माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी जाहिर केली.

ते,  बुलडाणा दौऱ्यावर अाले असता त्यांनी  पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट  केली.  ही पत्रकार परिषद शनिवार ५ सप्टेबर रोजी पत्रकार भवन येथे पार पडली. यावेळी पत्रकार परिषदेत नरेंद्र गुल्हाने गजानन उभरहांडे, सतीश बिल्लारी आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हयात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे.  शिक्षक मतदार संघासाठी नुकतेच उबाठा पक्षाकडून बुलडाण्याचे प्रा. डीएस लहाने यांना उमेदवारी जाहिर झाली. त्यांनतर अनेक ईच्छुकाकडून मतदारांचा जनसंपर्क केला जातो आहे.  २०२६ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष तसेच शिक्षक संघटनांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांचे नावही प्रमुख संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चेत आहे.  दरम्यान उपस्थित पत्रकारांना शिक्षण क्षेत्र हे आपण िनवडूण आल्यावर भ्रष्टाचार मुक्त करण्याचे आश्वासन देत जुनी पेशन योजने बाबत ही आपण प्रयत्न करणार असल्याचे जाहिर केले. अापण अपक्ष निवडूण आल्यानंतर  शिक्षकांच्या प्रश्नांसाठी  यापूर्वीही काम केले असून आगामी काळातही शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले. पक्षाकडून उमेदवारी मिळणे हा वेगळा विषय आहे; मात्र निवडणूक लढविण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  परिणामी त्यांच्या या घोषणेमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारीकडे लागलेल्या चर्चेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाने अद्याप उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नसताना देशपांडे यांनी स्वतःची भूमिका जाहीर केल्याने आगामी काळात पक्षाची भूमिका काय राहते, याकडे शिक्षक व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची व्याप्ती मोठी असून अमरावतीसह अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील शिक्षक मतदार या निवडणुकीत मतदान करतात. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारांना पाचही जिल्ह्यांत व्यापक संपर्क आणि संघटनात्मक बांधणी करावी लागते.  दरम्यान, २०२० च्या निवडणुकीत श्रीकांत देशपांडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या निवडणुकीत किरण सरनाईक विजयी झाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत देशपांडे पुन्हा मैदानात उतरल्यास मागील पराभवाची पार्श्वभूमी, शिक्षकांमधील त्यांचा संपर्क आणि बदललेली राजकीय परिस्थिती यामुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

 

जिल्हयातील ईच्छुक उमेदवार पडले मागे

बुलडाणा जिल्हयात सध्या शिक्षक भारती कडून  सुरेश देवकर हे प्रयत्न करत आहेत, तर उबाठा कडून डी एस लहाने  हे प्रयत्न करत आहे. दोघे ही उमेदवार बुलडाण्यातील असून त्यांनी आपआपल्या परिने जनसंपर्क करत आहे. मात्र देशपांडे हे बाहेर जिल्हयातील असून त्यांनी या प्रचारात आघाडी घेत सर्व प्रथम बुलडाण्यात पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केल्याने या प्रकारात त्यांची आघाडी असल्याचे चित्र आहे.

000

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!