महिला भजनी मंडळाला माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या वतीने टाळांचे वितरण

लोणार

श्रद्धा, वारकरी परंपरा आदी धार्मिक, सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने सक्रिय सहभाग घेणारे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी लोणार येथील जय मल्हार महिला भजनी मंडळाला टाळांचे वितरण केले.

मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भंडारा कार्यक्रमात सदर साहित्याचे वितरण करण्यात आले. गत दहा वर्षांमध्ये मेहकर लोणार तालुक्यातील शंभर पेक्षा अधिक वारकरी दिंड्या, भजनी मंडळे यांना आवश्यक त्या सर्व सहकार्यासह संजय रायमुलकर यांच्या वतीने टाळ,मृदंग, वीणा, तबला आदी साहित्यांचे आजवर वितरण करण्यात आले आहे. मेहकर लोणार तालुक्यातून पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या दिंड्यांना मोठ्या प्रमाणावर निवाऱ्यासाठी फोल्डिंग टेन्टचे वाटपही रायमुलकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
विविध धार्मिक कार्यक्रमांमधून नैतिकतेची बीजे पेरण्याचे कार्य वारकरी संप्रदायातील मंडळी करत असतात. युवा पिढीला त्यातून निश्चितपणे प्रेरणा मिळते. भजनी मंडळांच्या माध्यमातून भक्ती, अध्यात्म, संस्कार व सामाजिक एकोप्याचा संदेश समाजात पोहोचविण्याचे कार्य केले जाते,ते मौलिक आहे, असे विचार यावेळी संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले. मतदार संघातील विकास कामांबरोबरच धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राला बळ देण्यासाठी माझी भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे,असेही ते म्हणाले.
यावेळी जय मल्हार भजनी मंडळाच्या महिला भगिनी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, सुधाकर मादनकर,श्रीकांत मादनकर,लक्ष्मण नेवरे,प्रवीण नेवरे,दत्तात्रय नेवरे, संदीप मादनकर,राम मादनकर, समाधान मादनकर, संजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!