बुलढाण्यात जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
आजी-माजी व विद्यमान शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रंगनाथ स्पर्धा

बुलडाणा –
बुलढाणा जिल्ह्यातील आजी-माजी विद्यमान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय बुद्धिमान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा हायस्कूल येथे 15 फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे.
येथील बुलडाणा एज्युकेशन सोसायटी मार्फत सोसायटीचे माजी सचिव तथा बुलडाणा जिल्हा शिक्षण संचालक मंडळाचे माजी अध्यक्ष स्व.ऍड. जि.डी.कविमंडन यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा
१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता येथील एडेड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्व.या.मा.काळे सभागृहात करण्यात आले आहे.वरील स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
या वर्षीसुध्दा स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.
या स्पर्धेत शिक्षकांसाठी अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक शिक्षिकांना प्रथम व द्वितीय तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी प्रथम व व्दितीय असे स्व.बाळासाहेब कविमंडन चषक व सहभागी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या संदर्भात अधिक माहिती साठी मुख्याध्यापक डि.एम.किबहूने तसेच आर.एन.जाधव या संपर्क साधून जिल्ह्यातील आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आ



