चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कुंबळे-द्रविड यांच्या नावावर असतील दोन स्टँड्स

मुंबई,

गळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्टेडियममधील दोन स्टँड्सना अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांची नावे देण्यात आली आहेत. कर्नाटक क्रिकेट असोसिएशन (KSCA) चे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या समारंभात कुंबळे आणि द्रविड यांना भारतीय आणि कर्नाटक क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी दोन्ही खेळाडू भावूक दिसले आणि त्यांनी चिन्नास्वामी स्टेडियमशी संबंधित त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या.

अनिल कुंबळे भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहेत. त्यांनी कसोटीत ६१९ आणि एकदिवसीय सामन्यात ३३७ बळी घेतले. ते दोन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर एकूण ९५३ बळींची नोंद आहे. तर, राहुल द्रविडचे नाव जगातील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांमध्ये गणले जाते. ते सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली नंतर भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे तिसरे खेळाडू आहेत. द्रविडने ५०४ सामन्यांमध्ये २४,०६४ धावा केल्या आहेत, ज्यात ४८ शतके आणि १४५ अर्धशतकांचा समावेश आहे. कुंबळे आणि द्रविड, दोघांनीही वेगवेगळ्या वेळी भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!