विदर्भात प्रथमच महिलांसाठी बॉडी बिल्डिंग स्पर्धा

शेगाव येथे २६ वी विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न

विदर्भात प्रथमच महिलांसाठी बॉडी बिल्डिंग स्पर्धा
शेगाव येथे २६ वी विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी | बुलडाणा
शेगाव येथे २६ व्या विदर्भस्तरीय शरीर सौष्ठव (बॉडी बिल्डिंग) स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे विदर्भात प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. या ऐतिहासिक उपक्रमामुळे महिला खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विदर्भातील सर्वात भव्य व प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या २६ व्या विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे ‘शेगाव क्लासिक २०२६’ आयोजन संतनगरी शेगाव येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता स्व. गजानन दादा पाटील कॉटन मार्केट यार्ड येथे होणार असून, यंदा या स्पर्धेत महिलांचा प्रथमच सहभाग घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. अशी माहिती आयोजकांच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद सकाळी ११ वाजता हॉटेल अन्नपूर्णा येथे पत्रकार परिषदेत मध्ये नुकतेच देण्यात आली. इंडियन बॉडीबिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस फेडरेशनच्या मान्यतेने, बुलडाणा बॉडीबिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन व विदर्भ बॉडीबिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच छत्रपती तालिम ग्रुप, तेलीपुरा यांच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील होतकरू खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळावी, हा आयोजकांचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत ३ लाखाचे बक्षीस वितरण होणार आहे हे विशेष त्यामुळे ही स्पर्धा विदर्भातील सर्वात भव्य आणि प्रतिष्ठेची स्पर्धा समजल्या जात असून या शरीर सौष्ठव स्पर्धेत स्थानिकांसह इतर खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी आयोजक निखिल बावस्कर, आकाश राठोड, सदस्य प्रकाश बोडाडे, चेतन राजपूत, गोविंद वानखेडे, निलेश पाटील, संकेत देशमुख, तेजस पाडोळ , जय टायडे, कृष्णा मूणा आदी उपस्थित होते.

तीन टप्यात होणार स्पर्धा
ह्या स्पर्धेत तीन मुख्य टप्पे तयार करण्यात आले आहे. यात शेगांव फिटनेस आयकॉन ( फक्त शेगांव येथील स्थानिक स्पर्धकासाठी) महिला फिजिक स्पर्धा (विदर्भ स्तर) व शेगांव क्लासिक मेन ( विदर्भ स्तरीय, मुख्य स्पर्धा) अशा तीन प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे. ही स्पर्धा ७ वजन गटात घेण्यात येणार असून या स्पर्धेत ७ गटात ऐकून पारितोषिकांचा गौरव तसेच या स्पर्धकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात येणार आहे.

महिलांचा प्रथमच होणार सहभाग
विदर्भात प्रथमच बॉडी बिल्डींग स्पर्धेत महिलांसाठी स्पर्धा ठेवण्यात आली आहे. यात प्रथमच महिलांचा सहभाग होणार आहे, मात्र येथे महिलांनी पूर्व नोंदणी करणे गरजेचे आहे. या स्पर्धेत महिलांचा प्रथमच सहभाग घेतला जात असून, महिला स्पर्धकांसाठी विशेष व सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांनी पूर्वनोंदणी करणे अनिवार्य असून वेळेनंतर नोंदणी स्वीकारली जाणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्पर्धेची वजनमोजणी स्पर्धेच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कुणबी समाज भवन, धानुका कंपाऊंड येथे होणार आहे.

 

स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंसाठी आशेचा किरण – निखिल बावस्कर
आजचा युवक जर मैदानात स्वतःला सिद्ध करत असेल, तर उद्याचा शेगाव अधिक सक्षम, सशक्त व अभिमानास्पद असेल. या स्पर्धेत महिलांची स्पेशल व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या संरक्षणाची पूर्ण काळजी घेण्यात येणार आहे. शेगावात होणारी ही स्पर्धा नसून खेळाडूसाठी आशेचा किरण आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!