गावरान आंब्याला भरघोस मोहर; यंदाचा आंबा हंगाम आशादायक

गावरान आंब्याला भरघोस मोहर; यंदाचा आंबा हंगाम आशादायक
लोणार | प्रतिनिधी
सध्या लोणार परिसरातील गावरान आंब्याच्या बागांमध्ये आंब्याला चांगल्या प्रमाणात मोहर (फुलोरा) आलेला दिसून येत आहे. हवामान पोषक राहिल्याने झाडांवर भरघोस व निरोगी फुलोरा उमलला असून, यंदाचा आंबा हंगाम चांगला जाण्याची शक्यता शेतकरी व आंबा उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेषतः देशी गावरान आंब्याच्या झाडांवर आलेला मोहर टिकून राहिल्यास येत्या काळात दर्जेदार, गोड व नैसर्गिक आंब्याचे भरपूर उत्पादन होण्याची शक्यता आहे. सध्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुढील काळात अवकाळी पाऊस, गारपीट किंवा तापमानातील अचानक बदल झाला नाही, तर हा मोहर कायम राहून फळधारणा चांगल्या प्रमाणात होईल, असा अंदाज आंबा उत्पादक व्यक्त करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या हंगामात सर्वसामान्य ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचा गावरान आंबा सहज उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, आंबा उत्पादक शेतकरी झाडांची नियमित निगा, योग्य औषध फवारणी व आवश्यक काळजी घेत असून, निसर्गाची साथ लाभल्यास यंदाचा आंबा हंगाम समाधानकारक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!