राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती अभियान

राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसीचा उपक्रम

बुलडाणा | प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, बुलडाणा येथे मेरा युवा भारत यांच्या सहकार्याने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती अभियान राबवण्यात आले. हा कार्यक्रम नुकतेच पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणे व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाबाबत जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष जैन होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्याम भांबळे उपस्थित होते. तसेच तहसील कार्यालय, बुलढाणा येथील रवि सरोडे, समाधान चिंचोले, मेरा युवा भारतचे धनंजय चाफेकर, अजयसिंह राजपूत हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्काराने करण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसीमधील नवमतदारांचा विशेष सत्कार करून त्यांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मेरा युवा भारतच्या वतीने प्राचार्य डॉ. शिरीष जैन यांचा समाधान चिंचोले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमधील त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाध्यक्षांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मतदार प्रतिज्ञा देण्यात आली. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून मतदार जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. प्रकाश केंद्रे, डॉ. दीपक भुसारी व प्रा. सतीश शेळके यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी रोहित सालकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मीना भालके, आकाश चाफेकर (मेरा युवा भारत) आकाश सालोक (मेरा युवा भारत) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल मतीन, माजिद, प्रमोद वरणकर तसेच एनएसएस स्वयंसेवकांनी विशेष सहकार्य केले.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!