टपरीवर छापा : गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त एकाविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव | प्रतिनिधी

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने एका टपरीवर छापा टाकून गांजा सदृश्य अमली पदार्थ व रोख रक्कम जप्त केल्याची कारवाई केली आहे. या प्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अटाळ येथील एक इसम गांजाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती. त्या आधारे ३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास नायब तहसीलदार व पंचांच्या उपस्थितीत अटाळ येथील जीवनसिंग राजाराम पवार (वय ३९) यांच्या तीन पत्र्याच्या टपरीवर छापा मारण्यात आला.

छाप्यादरम्यान टपरीतील लाकडी काऊंटरखाली ठेवलेल्या वायरच्या पिशवीत गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. या अमली पदार्थाची किंमत सुमारे १८ हजार ४८० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ९३० रुपये रोख रक्कम मिळून आली.

पोलिसांनी गांजा सदृश्य अमली पदार्थ व रोख रक्कम असा एकूण १९ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार रवी मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जीवनसिंग पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
00

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!