व्यसनमुक्त जीवन जगून आयुष्यात यशस्वी व्हावे!

प्रतिनिधी | मेहकर
विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगून आयुष्यात यशस्वी व्हावे, असे आवाहन विठ्ठल – रुक्मिणी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव मगर यांनी केले.
तालुक्यातील खंडाळा येथील स्व. भास्कराव शिंगणे विद्यालयात एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनी भरविण्यात आली. लोककलावंत फाऊंडेशन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी आयोजित या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन शाहीर ईश्वर गवई यांनी केले. याप्रसंगी वसंतराव मगर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जयंत वानखेडे, प्रा. वासुदेव गोलाईत, रफिक कुरेशी, प्राचार्य एस. व्ही. गव्हाळे, प्रा. सुनील खिल्लारे, प्रा. गंगाधर गाडेकर, अमोल गिरे, जी. एम. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहीर ईश्वर मगर यांनी व्यसनमुक्ती प्रबोधन गीत सादर करून व्यसनाधिनतेपासून दूर राहण्याचे आव्हान केले. यावेळी जयंत वानखेडे व प्रा. गोलाईत यांनी श्रमसंस्कार व व्यसन या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफिक कुरेशी यांनी केले. गणेश राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शरद वानखेडे, गजानन सोनुने, पुरुषोत्तम देवकर, बबन राऊत, संतोष शिंदे यांनी पुढाकार घेतला. समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
……….

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!