पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; येरवड्यात रिक्षा चालकाकडून छेडछाड

मनीष अग्रवाल : पुणे

 

पुणे शहरात एका प्रवासी महिलेची छेड काढल्याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. ही घटना येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे घडली. ख्वाजा नुरुद्दीन टिनमेकर (वय 54, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पीडित 30 वर्षीय महिलेने याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातून जात असताना रिक्षाचालक ख्वाजाने तिला अडवले आणि तिची छेड काढली. महिलेने आरडाओरडा करताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी ख्वाजाला अटक केली. पोलिस कर्मचारी एन. जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग

दरम्यान, येवलेवाडी पोलिसांनी घरासमोर खेळणाऱ्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली. प्रशांत काळे (वय 30, रा. राजमाता कॉलनी, कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या पालकांनी येवलेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराची अकरा वर्षांची मुलगी 4 फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपी प्रशांत काळे तेथे आला आणि त्याने मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याने मुलीला ‘तू मला आवडतेस’ असे म्हटले. घाबरलेल्या मुलीने ही घटना आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये, तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. महाडिक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!