पुण्यातील इंदापूर भागात होणार नवी एमआयडीसी

मनीष अग्रवाल, पुणे,

    हजारो एकरांवर डझनभर एमआयडीसी असलेल्या पुण्यात आणखी एका नव्या एमआयडीसीची भर पडत आहे. सोलापूरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदापूर येथील रत्नपुरी मळ्यात नवीन एमआयडीसी होत आहे. त्याला राज्य शेती महामंडळाची एक हजार एकर जमीन देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने एका झटक्यातच मंजुरी दिली. परंतु गेल्या 14 वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या सोलापूरच्या कुंभारी एमआयडीसीला जलसंपदा विभागाची साधी ‘ना-हरकत’ (एनओसी) मिळत नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधी कधीच आक्रमक होताना दिसत नाहीत.

वाहतुकीच्या समस्येमुळे पुण्यातील मोठे उद्योग बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. टू-टियर शहरांमध्ये सोलापूरने त्यांचे लक्ष वेधले असतानाच, इंदापूरच्या या नियोजित एमआयडीसीने त्यांना रोखून धरण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थातच पुण्यातील उद्योजकांना पुण्यातच पर्याय देण्यासाठी तिथल्या राजकीय मंडळींनी केलेला हा ‘उद्योग’ म्हणता येईल. वास्तविक इंदापूरपासून 59 किलोमीटर अंतरावरच कुरकुंभ एमआयडीसी 1800 एकरांवर विस्तीर्ण पसरली. तिथे जमिनी शिल्लक असताना, इंदापूरच्या रत्नपुरी मळ्यात आणखीन एक एमआयडीसीची निर्मिती होत आहे. त्यामागे प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच असून ज्याच्या अभावानेच सोलापूरची औद्योगिक पीछेहाट सुरू झाली. अक्कलकोट रस्त्यावरील एमआयडीसीत आता जागा नाही, चिंचोळी एमआयडीसीतही इंचभर जागा नाही. उद्योगांच्या विस्ताराला, नव्या गुंतवणुकीलाच जागा नसल्याने उद्योजक नव्या एमआयडीसींच्या शोधात आहेत.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!