मुलुंड मेट्रो दुर्घटना: प्रोजेक्ट डायरेक्टरसह 5 जणांना अटक

मुंबई,

मुलुंड मेट्रोचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी आता कायदेशीर कारवाईला वेग आला असून, याप्रकरणी पोलिसांनी रिलायन्स अस्तालदीशी संबंधित ‘मिलन रोड बिल्डटेक’ या कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करत आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायझर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांचा समावेश असून, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत या सर्वांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

मुलुंड येथील एलबीएस रोडवर वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ झालेल्या या अपघातात उत्तर प्रदेशातील पर्यटक रामधन यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. एमएमआरडीए मार्फत सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या ढिगाऱ्याखाली तीन वाहने दबली गेली असून, या घटनेमुळे ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल ७ तास बंद ठेवण्यात आली होती. ज्या टप्प्यात हा अपघात झाला, तिथल्या बांधकामाची जबाबदारी टाटा प्रोजेक्ट्स आणि चायना हार्बर इंजिनिअरिंगकडे असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

या प्रकरणी कायदेशीर कारवाईला वेग आला असून, पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायझर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार (डीबी हिल एलबीजी कंपनी) यांचा समावेश आहे. दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजीत साळवे यांच्या निलंबनाचे आदेश दिले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मुलुंड पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!