संदीप शेळके यांच्या एकनिष्ठतेवर वरचढ ठरली राजकीय महत्त्वाकांक्षा

राजकारणातील एकनिष्ठता आता चर्चेपुरती, शेळके यांचा उबाठा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश

प्रतिनिधी | बुलडाणा
राजकारणात कधीकाळी एकनिष्ठतेला खुप महत्व दिले जात होते. राजकिय मंडळी पक्षाचे काम करणे सोडून देत होते, परंतू पक्ष बदलत नव्हती. परंतू अलीकडे राजकिय पुढाऱ्यांच्या महत्वाकांक्षा खुपच वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही पुढारी तर वर्षभरातच एकापेक्षा अनेक पक्ष बदलत असल्याचे दिसून येत आहे. या मानसिकतेतून उबाठाचे शांत व संयमी स्वभावाचे युवा नेतृत्व समजले जाणारे संदीप शेळके सुध्दा सुटू शकले नाही. शेळके यांनी नुकतेच उबाठातून कांग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या ही पक्ष एकनिष्ठेतवर त्यांची राजकिय महत्वाकांक्षा वरचढ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर संदीप शेळके नावाचा पुढारी जिल्हयाला मिळाला. शेळके यांनी आपली प्रतिमा ही संर्घषातून तयार केली आहे, त्यांनी शुन्यातून विश्व तयार केले आहे, याची माहिती जिल्हयातील प्रत्येकाला आहे. प्रारंभी ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. परंतू लोकसभा निवडणूकीत अपक्ष निवडणूक लढवून त्यांनी चाचपणी केली. या निवडणूकीत त्यांचा राजकिय नखवेपणा असल्याने राजकारणातील लपलेले चेहरे ओळखता आले नाही, परिणामी त्यांना या निवडणूकत चांगले अनुभव मिळाला. संदीप शेळके हे सर्वसामान्य लहान व मोठयांना सारखीच वागणूक व आदर देत आले आहे, त्यामुळे त्यांना अद्याप ही राजकिय हवा लागली नाही असे बोलले जात होते. त्यामुळे ते कायम एकनिष्ठ राहतील अशी आशा नागरिकांना होती. राजकारण हे अलीकडे क्रिकेट च्या अनिश्चित खेळासारखे झाले आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शेळके यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या अनेक समर्थकांना वाईट ही वाटले असेल, परंतू मोठी संधी व मोठी महत्वाकांक्षापोटी अशा भावनांना गुुंडाळून ठेवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काम करण्यासाठी मी धडपडतोय, संधी नसेल तर कस थांबणार
ज्या पक्षाची चलती असते, त्या पक्षाकडे कार्यकर्त्यांचा प्रवाह वाढत आहे. मी जेथे होतो, तेथे काम करण्यासाठी खुप काही होते, मी काम करण्यासाठी धडपड करत होतो, परंतू मला तिथे संधीच मिळत नव्हती, मी राजकारणात सामान्यांसाठी काहीतरी करण्यासाठी पाय ठेवला आहे. मी त्यांच्यासाठी काहीच करु शकलो नाही तर तेथे थांबून काय करणार, माझी महत्वाकांक्षा केवळ सर्वसामान्यासाठी काम करणे येवढीच आहे म्हणून सदर निर्णय घेतला. येथे संधी ही आहे व जबवादारी देखील.
संदीप शेळके, जिल्हाध्यक्ष जिल्हा कांग्रेस कमेटी बुलडाणा
0000

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!