भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटीच्यावतीने चौकशी करा

दोषींवर कठोर कार्यवाही करा, अन्यथा तीव्र आंदोलन – माकपची मागणी

प्रतिनिधी | बुलडाणा
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य समितीने नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची एसआयटीच्यावतीने सखोल चौकशी करून सर्व दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास माकपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात माकपच्यावतीने शासनाला निवेदन देण्यात आले.
या निवेदनात माकपच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की, राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक एखाद्या व्यक्तीने एकट्याने करणे शक्य नसून, त्यामागे काही प्रभावशाली राजकीय नेते, सत्ताधारी घटक आणि प्रशासनातील व्यक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि कालबद्ध चौकशी विशेष तपास पथक (SIT) किंवा न्यायालयीन देखरेखीखाली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, अशोक खरात यांच्याशी संबंधित सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही राजकीय नेते, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींची नावे जाहीर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही माकपने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झाल्याचा गंभीर आरोप असून, सरकारने किंवा प्रशासनाने कोणतीही ढिलाई न करता कठोर पावले उचलावीत, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास माकप रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व प्रगतिशील, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तींचा विरोध करण्याचे आवाहन राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!