बुलडाण्यात रामकथा मंडपाचे भूमिपूजन विधीवत पडले पार
विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेत सहभागी व्हावे — राधेश्याम चांडक

प्रतिनिधी | बुलडाणा
येथील सद्भावना सेवा समिती, बुलडाणा यांच्या वतीने येत्या ७ एप्रिलपासून साध्वी सृष्टीलता रामायणी यांच्या वाणीतून रामकथा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रामकथा मंडपाचे भूमिपूजन सोमवारी ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता लहाने लेआऊट, चिंचोले चौक, येथे पार पडले.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन विधान परिषद सदस्य धिरज लिंगाडे व समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी रामकथेला शुभेच्छा दिल्या, तर नगराध्यक्षा पुजा गायकवाड यांनी नगर परिषदे मार्फत सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी कार्यक्रमाला सद्भावना सेवा समितीचे चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, सुरेश गट्टाणी, तिलोकचंद चांडक, सिद्धार्थ शर्मा, उमेश मुंदडा, सुभाष दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी रामकथा प्रवक्त्या साध्वी सृष्टीलता रामायणी यांनी व्हॉईस संदेशा द्वारे शुभेच्छा देत कथा निर्विघ्नपणे पार पडावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी कार्यक्रमात डॉ. पवन बजाज, कन्हैय्या बंग, अमित महाजन, मधुकर गायकी, गिरीधारी शर्मा, तुषार भट्टड, सागर घट्टे, विजय शर्मा, कमलेश चांडक, लाला माधवाणी, समाधानअप्पा पारसरकर, महेश टावरी, अनंता देशपांडे, मनमोहन शर्मा, पंजाबराव इलग, आनंद वर्मा, दिपक वर्मा (मुख्य यजमान), ललित चोपडा, नितीन जैस्वाल, गजु कुळकर्णी, गजानन भराड, अनंता वाघ, देविदास बावस्कर, शिवाजी देशमुख, पुरणमल शर्मा यांच्यासह महिला वर्गातील आरती शर्मा, संगीता बाहेती, प्रेमा राठी, मनिषा बाहेती, माया शर्मा, जमुना शर्मा, गीता शर्मा, ज्योती तापडिया, ॲड. सीमा राजोरिया, किरण अग्रवाल, नेहा अग्रवाल, अंजली परांजपे, आदी उपस्थित होत्या.
नउ दिवस राबवणार प्रश्न मंजूषा
रामकथेच्या निमित्ताने नऊ दिवस विविध विषयांवर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत बुलडाण्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राधेश्याम चांडक यांनी केले. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांना रामकथेसाठी पाठवावे, अशी विनंतीही त्यांनी केली.




